मी तलाठी

Talathi bharti – तलाठी भरती-2023

जिल्हानिहाय

नांदेड विभाग मध्ये 119 तलाठी पद 2023 – How to fill online form

 Mahsul – Van Vibhag Nanded Talathi Recruitment 2023

नांदेड तलाठी भारती 2023: महसुल आणि वन विभाग नांदेड (महसूल आणि वन विभाग नांदेड) यांनी तलाठी पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत. महसुल – वनविभाग नांदेड (महसूल आणि वन विभाग नांदेड) तलाठी भरती मंडळ, नांदेड यांनी जून 2023 च्या जाहिरातीत एकूण 119 रिक्त पदे जाहीर केली आहेत. उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात (@ PDF) काळजीपूर्वक वाचा. नांदेड तलाठी भरतीसाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२३ आहे).

Nanded Revenue and Forest Department
Nanded Revenue and Forest Department

Nanded Talathi Bharti 2023: Mahsul an Van Vibhag Nanded (Revenue and Forest Department Nanded) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Talathi. Eligible candidates are directed to submit their application online through https://mahabhumi.gov.in/mahabhumilink this Website. Total 119 Vacant Posts have been announced by Mahsul – Van Vibhag Nanded (Revenue and Forest Department Nanded) Talathi Recruitment Board, Nanded in the advertisement June 2023. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. Last date to submit application for Nanded Talathi Bharti is 17th July 2023).

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण ४६२५ पदांच्या सरळसेवा भरती करीता दि. १७ ऑगस्ट २०२३ ते दि. १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्रतील एकुण ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (Computer Based Test) परिक्षा घेण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे :

  • उमेदवाराने प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने परीक्षेकरिता अर्ज सादर करताना उमेदवाराने संबंधित कागदपत्र आणि दाखले पीडीएफ (PDF) स्वरुपात अपलोड करणे अत्यावश्यक आहे.
  • उमेदवाराने अर्जातील नावाचा पुरावा म्हणून (एसएससी किंवा तस्यम) गुणपत्रिका सादर करणे गरजेचे आहे.
  • वयाचा आणि शैक्षणिक पात्रतेचा पुरावा.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा.
  • अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलेअर (NCL) प्रमाणपत्र.
  • पात्र दिव्यांग व्यक्ती/माजी सैनिक/खेलाडू/अनाथ/प्रकल्प अथवा भूकंपग्रस्त/ अंशकालीन पदवीधर/ नावात बादल झाला असल्याचा पुरावा.
  • वरील प्रमाणपत्र शासनाच्या विहित संकेतस्थळावर सादर केल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही.

विहित कागदपत्रे / प्रमाणपत्रे संलग्न (Upload) करणे:-

1. प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने परीक्षेकरिता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे PDF फाईल फॉरमॅट मध्ये संलग्न (Upload) करावीत.
2. विविध सामाजिक व समांतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर (Check eligibility) उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे / प्रमाणपत्रे (लागू असलेली) संलग्न (Upload) करणे अनिवार्य आहे

परीक्षा शुल्क

  1. तलाठी-पेसा क्षेत्राबाहेरील खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना १०००/- रुपये तर, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अशा राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९००/- रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
  2. तलाठी-पेसा क्षेत्रातील राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९००/- रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
  3. माजी सैनिकांना कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही.
  4. अर्ज सादरीकरणाचे टप्पे पूर्ण झाल्यावर ‘पे फी (Pay Fee) वर क्लिक करून अर्ज पूर्ण करायचा आहे.
  5. परीक्षा शुल्क हे संपूर्णतः Non-Refundable आहे.
  • सदर अर्ज फक्त ऑनलाइन प्रणालीद्वारे स्वीकारला जाणार आहे.
  • उमेदवार फक्त एकाच जिल्ह्यासाठी अर्ज सादर करता येईल. वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी किंवा एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास असे अर्ज अपात्र ठरवण्यात येतील.
  • शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरच https://mahabhumi.gov.in उमेदवार अर्ज सादर करू शकतील.
  • अर्ज सादर केल्यानंतर दिलेल्या वेळेत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज भरण्याची व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख लक्षात घेऊन उमेदवाराने दिलेय वेळेत अर्ज आणि शुल्क भरने बंधनकारक राहील.
  • प्रस्तुत परीक्षेसाठी विविध केंद्रांचा तपशील http://mahabhumi.gov.in वर परीक्षा योजना/पद्धती या सदरामध्ये उपलब्ध आहे.
  • अर्ज सादर करताना जिल्हा (परीक्षा) केंद्राची निवड करणे आवश्यक आहे.
  • जिल्हा परीक्षा केंद्र बदलाची विनंती कोणत्याही परिस्थितीत किंवा कारणास्तव मान्य केली जाणार नाही.

जिल्हा केंद्र निवड

1. प्रस्तुत परीक्षेकरीता विविध जिल्हा (परीक्षा) केंद्राचा तपशील https://mahabhumi.gov.in संकेतस्थळावरील सदर परीक्षेच्या परीक्षा योजना / पध्दती या सदरामध्ये उपलब्ध आहे.

2. अर्ज सादर करताना जिल्हा (परीक्षा) केंद्राची निवड करणे आवश्यक आहे.

3. जिल्हा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही.
जिल्हा केंद्र निवडीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास उमेदवाराने अर्जामध्ये दिलेल्या कायमस्वरुपी रहिवास पत्याचे आधारे संबंधित महसूली मुख्यालयाच्या जिल्हाकेंद्रावर किंवा नजिकच्या जिल्हाकेंद्रावर प्रवेशपत्र देण्यात येईल. याबाबत शासनाचे त्या त्या वेळचे धोरण व निर्णय अंतिम राहील.

District wise Vacancy

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *